Monday 8 February 2016

KoraiGaD !

कोरीगड - कोराईगड
      चला !!!!  नवीन वर्षाची सुरुवात खुप छान झाली , एकंदरीत खूप जूना प्लान होता जायचा की माझ्या मैत्री ग्रुपला घेऊन एकदा ट्रेकला जायच पण जमतच नव्हता, शनिवार रविवार आणि कुठलाही सुट्टीचा दिवस तेव्हा फ़क्त क्रिकेट आणि क्रिकेट ( तस मला काही फार चांगल खेळता येत असही नाहीं पण मित्रांना खुप वेड क्रिकेट च . ) , तर ते आत्ता कुठे काही लोक स्वतःहुन तयार झाले आणि एकदा विचारले तर लगेच हो म्हणाले. ट्रेक साठी मित्रांनी ind vs aus च्या T -20 मॅच वर पाणी सोडले , काही लोक येतो म्हणून आले नाहीत ती गोष्ट वेगळी पण जे आले त्यांनी मज्ज्या केली. मग प्लान ठरला कोराईगडावर जायचा तसा छोटा आहे आणि जवळही आहे .
                       लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते.  मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. सकाळी सकाळी उठलो पण उठून काही फायदा झाला नाही. कारण लोकांनी यायला वेळ केला. साधारण १० वाजेपर्यंत सगळे आले निघालो १०.३० वाजता , देहुरोड -सोमाटणे फाटा - असे करत करत मधे रुपेश मिसळला थांबलो मिसळ खाल्ली ( आता इथे मिसळ ची चव ही बेचव झालेली आहे,पूर्वी सारखी सारखी राहिलेली नाहीं ) आणि मग निघालो.



               


                   लोणावळ्यात आम्ही १२ च्या दरम्यान पोहोचलो. लोणावळ्यांपासून साधारण गड २५ kms आहे ऊन भरपूर होत पण हवा थंड असल्या मुळे छान वाटत होत.बाइक वर जाताना मधे लायंस पॉइंट लागतो तिथे १० मिनट थांबलो आणि पुढे निघालो. अम्बी व्हॅली चा तो रस्ता खूपच सुन्दर आहे वळणावळणाचा घाटरस्ता, दोन्ही बाजूला खुप झाड़ी, रस्त्यावर छान सावली आणि दुपारच्या उन्हातही थंड वारा. आम्ही १२.३०-१२. ४५ ला पायथ्याला पोहोचलो . गाड़ी तिथेच लावली आणि चालायला सुरुवात केली. आता मात्र थंड वारा वगैरे प्रकरण नव्हत , कड़क ऊन लागत होत. थोडेच पुढे गेल्यावर रस्ता सोडून आम्ही झाड़ी झुडपात घुसलो मस्त सावली मधून चालू लागलो.

 वर पोहोचायच्या थोड़े आधी एक गणेश मंदिर लागते तिथेच एक गुहा आणि पाण्याचे टाके आहे , तीकडेच आम्ही ५-१० मिनीट थांबलो तर दुपारच्या उन्हात एक सापाच पिल्लू आम्हाला गणेश मंदिरावरच्या दगडांवर दिसल. साधारण २-३ फुट लांब होता.  बहुदा धामण असावा कारण रंग तपकिरी पिवळा आणि अंगावर बारीक़ नक्षी होती.थोडेच वर गेल्यावर उजव्या हाताला पिण्याच्या पाण्याचे टाके लागते , उन्हाने चालताना थोडा थकवा येतो पायऱ्याही तश्या भरपूर आहेत. आपले सगळे मित्र बऱ्याच दिवसातुन ( वर्षातुन म्हणाले तरी चालेल ) ट्रेक करत आहेत आशु,प्रतिक सोडला तर सगळे लोक बरेच दिवसातुन आले होते तरीही मंडळी कुठेही जास्त वेळ न थांबता आम्ही ४५-५० मिनिटांत आम्ही वर पोहोचलो गेल्यागेल्या समोरच दोन तळी दिसतात गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे.पाहिले आम्ही मग डाव्या बाजूच्या बुरुजा वर गेलो. वरुन अम्बी व्हॅली एकदम छान दिसत होती.
 जरा वेळ तिथे बसल्यावर थोड़े खाली त्याच बुरुजा वर सावलीत आम्ही जरा बसलो , मी मसाला भात बनवला होता आणि सुशांतने भाजी पोळी आणलेली होती,खाऊन झाल्यावर आम्ही दम शेरास खेळलो जामच मजा आली. टीम मी प्रणव आणि विनय वि. आशिष, प्रतिक, सुशांत. आणि आम्ही जिंकलो
     दुपारी आम्ही गडाच्या तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घातला. वरुन खालचा परिसर अप्रतिम दिसत होता. फिरून झाल्यावर लगेच आम्ही खाली उतरायला चालू केल.तासाभरात खाली उतरलो आणि लोणावळ्यात "गोल्डन वडापाव" इथे मस्त भजी आणि वडापाव हाणला. ( चांगला आहे इथे वडापाव खाऊ शकता :) ) आणि मग निघालो सगळे घरी.
       असा एक दिवसाचा छोटा ट्रेक छान आपण ठरवू शकता.
 ट्रेक सदस्य :
१. सुशांत साळवी.
२. आशिष दांदडे.
३. प्रतिक नहिरे .
४. प्रणव दीक्षित .
५. विनय कुलकर्णी.
६. निखिल चौधरी.  
   

1 comment: