Wednesday 17 February 2016

A SIMPLE JUNGLE WALK BECOMES AN ADVENTUROUS TREKK..!!! PaDarGaD.....

पदरगड !      
         ७ -२-१६ रविवार ५ वाजता मिटिंग झाली लोक ठरले आणि ट्रेक ठरला "भीमशंकर - नागफणी - कोकणकड़ा - पांडवलेणी " निघायची वेळ पक्की झाली १२-२-१६ शुक्रवार दुपारी ५ वाजताची , शेवटचा थांबा माझा होता , १७ सीटर गाड़ी सगळ्यांना घेत घेत माझ्या घरी गेली आणि मी गाडीसाठी निगडी चौकात गाड़ी पकडायला, नंतर कळल्यावर परत मागे आलो गाडीत बसलो आणि सगळे निघाले एकदाचे.
         सगळे गप्पा मारत मारत निगडी -भोसरी - चाकण - राजगुरुनगर असे करत मधे नाश्ता करायला म्हणून थांबलो. पुरोहित नावाच्या एका होटेल मधे खाऊन आम्ही निघालो. गाड़ीमधे सुमीतला आणि सतीशदादा ला टिव्ही पहायची इच्छा झाली पण ती काही पूर्ण होऊ शकली नाहीं. मधे साहिल ने त्याच्या शाळेत त्याने केलेल्या "राधासगर" नावाची एक आख्खी स्क्रिप्ट आम्हाला न अडखळता सांगितली अगदी छान बोलला. मंदार म्हणत होता आपला ट्रेक म्हणजे आपण सगळे बागेत फिरायला चाललो आहे , काहीच वाटणार नाही राव !!! बंड्या !!! आपण थोड़ा अवघड ट्रेक करायला पाहिजे तू प्लान कर आपण जाऊया ! , अंजू ताईने व्हॉट्स अॅप वर कमेंट दिली होती की "ENJOY  YOUR JUNGLE WALK"
त्यामुळे आणखीनच आपण फुल टाइमपास ट्रेकला चाललो आहे असे बऱ्याचश्या लोकांना वाटत होते पण नंतर आपले काय होणार आहे कोणाला कल्पनाही नव्हती , भीमाशंकरला आम्ही साधारण रात्रि ८.३० ला पोहोचलो. उतरल्या उतरल्या पहिल्यांदा लक्षात आल की खूपच थंडी आहे. गेल्या वर प्रथम दर्शन घेतले आणि तीकडेच गव्हान्दे नावाचे जे पुजारी आहेत या एका गृहस्थांकडे उतरलो, इथेच मग त्यांच्या व्हारांडयामधे आमचे डब्बे काढले, आणि लोकांना भरपूर भूक लागली होती त्यातल्या त्यात सुम्याने ऑफिसचा डब्बा आणला होता त्यामधे तूप-गुळ पासून ते सगळ पौष्टिक जेवण सुम्याकड़े होता ( त्याकडे किमान ५-६ प्रकारचे वेगवेगळे डब्बे तरी असावेत.) तेव्हाकुठे त्याची तब्येत एवढी छान कशी याचा सुगावा लागला इथे सुमितची बऱ्यापैकी खेचली . २-३ प्रकारचे पराठे, भाकरी, बटाटा , चूका भाजी असे एकंदरीत भरपूर जेवण झाले, मग बाहेर झोपायच म्हणून ठरते न ठरते तोच आतल्या ताईंनी सांगितले " आत झोपा तुम्हाला बाहेर थंडी सोसणार नाही ". आम्ही आपले टर उडवून आत गेलो झोपायला "म्हणे आपल्याला थंडी सोसणार नाही  हा!!! हा!!! हा!! "  , मस्त टी-२० क्रिकेट मैच चालू होती ती पहात झोपलो. एव्हाना थंडी जाणवायला लागली होती . मी यावेळी कॅरिमॅट घेतले नव्हते बेडशीट चादर आणि शाल मग फर्शीवर बेडशीट त्यावर शाल अंथरली अणि झोपलो. तासा - दीड तासाने लगेच जाग आली, चादर पूर्ण गार पडली , ओली चादर घेतली आहे असेच वाटले , झोपच उडाली , मग आधी खाली अंथरलेली शाल अंगावर घेतली तर फर्शीसहित बेडशीट दोन्हीही गार !!!!  थोड्याच वेळात ३ - साडे ३ वाजता साहिल उठला आणि उठून उभा राहिला त्याला विचारले कोणीतरी (बऱ्याच लोकांची अवस्था माझ्यासारखीच होती ) का उठलास तर म्हणाला " झाली माझी झोप " असे काहीसे चालु असताना मला कधी तरी झोप लागली आणि लगेच परत ७ वाजता जाग आली , तेव्हा बऱ्यापैकी सगळे जागे झाले होते, तिकडच्या ताईंनी मस्त सगळ्यांना चहा केला, चहा प्यायलो , मग सुम्याने एक छान अभंग गव्हान्दे पुजारीना ऐकवला, त्यानंतर सगळ्यांनी त्यांच्या कड़े भीमाशंकराच्या मंदिरात अभिषेकाला पावती करून आणि गव्हान्देना धन्यवाद करून आम्ही निघालो. सकाळी ८. ४५ ला आम्ही भीमाशंकरा वरुन निघालो ,
भीमाशंकर मंदिराबाहेर  
मस्त थंडी होती तिकडे जाताना रस्ता विचारला आणि तसे निघालो जंगलाचा तो रस्ता खूपच भारी होता .जाताना मंदार परत म्हणाला की "आपण हां या वेळचा ट्रेक म्हणजे बागेत फिरायला आलोय असा करतोय , भीमाशंकरला आलो आरामात डब्बे खाल्ले टी व्ही पहिला झोपलो सकाळी सकाळी द्राक्षे खाऊन झाली , आता थोड़े पुढे आलो न आलो तेव्हा केळी बाहेर आली , हे म्हणजे आपल अगदीच आरामात चालू आहे , काही टेँशन नाही काही नाही ".
        २ - २.३० तासाने वाटेत थोड़े पुढे एक झोपड़ी लागली सगळे थांबले आणि तिथेच "गणपत हंडे" नावाचे एक गावकरी तिकडे आम्हाला भेटले. मग मंदार , मधुकाका त्यांच्याशी बोलत होते. तेव्हा तिथल्या तिथे आमच ट्रेकच ठिकाणच बदलल गेल ,

झोपडी 
गणपत हंडे यांच्या सोबत चर्चा चालू असताना 
आता ते पदरगड़ असे झाले होते. वाटेत कळल की तिथे एक कातळटप्पा पण आहे , मधे पदरवाडी कड़े जाताना रस्त्यात समोर पदरगड़ दिसत होता , काय अफ़लातून होता तो वाह !!! तो पाहून जाताना थोडीशी मज्ज्या येईल म्हणून आम्ही खुश झालो.
समोर पदरगड़ आणि खाली जंगल 
हाच तो पदरगड़ 











     
       
      मधे रस्त्यात गावात पोहोचयच्या आधी एके ठिकाणी थांबलो थोड़ा वेळ आराम केला शची ने लाडू आणले होते सगळ्यानी लाडू खाल्ला आणि तिथेच एक मोठा दगड होता, मंदार ने मुलांमधे एक शर्यत लावली की कोण त्या दगडावर चढून दाखवतय, मग सगळी पोरे तिकडे दगडावर तिथे त्यांचे फोटो झाले , पोरांचे झाले आता ताईलोक आणि आम्ही , मग मी वर चढ़ून गेलो मागोमाग शची अाली मग मीनल असे सगळे वर जाऊन आले.
"रॉक क्लाइम्बिंग" बच्चे कंपनी 













             
 बाजुलाच एक झाड़ होता सुम्या म्हणाला चल आपण झाडावर जाऊया , मी गेलो आणि हा बंड्या खालीच थांबला म्हणला जाऊदे अरे मी आता वर नाहीं येत ,मी वर बसलोच होतो तेवढ्यात त्याच फांदीवर एक माकड़ कुठून आले काय माहित एकदम माझ्या मागून फांदीच्या पलीकडे गेले , पहिल्यांदा ते एकदम आले तेव्हा माझी टरकली, पण मग थोड़ा सावरलो ,

आणि इथे लोकांनी फोटो काढायला चालू केले , नंतर ते थोड़े गुरकायला  लागले मी आपल गपगुमान खाली उतरलो आणि मंदार ने त्याला केळ दिले, दिले म्हणजे त्याकडे टाकले तो पहिला झेल काय सॉलिड पकडला त्याने , सगळे त्याकडे पहात राहिले , मग सगळे कॅमेरा घेऊन तयार पुढचा झेल कॅमेरा मधे टिपण्यासाठी , कसल काय पुढचे दोन्ही झेल त्याने सोडले मग आम्ही त्याला सोडले आणि निघालो पुढे !.    
       सकाळी १०.३० ला जंगल खाली उतरलो , पदरवाडीत आलो आणि मीना आत्यानी आणि मीनल ने आणलेले भोपळ्याचे घारगे काढले ,खूपच मस्त झाले होते ते ,पदरगड़ावर यायला सुमीत आधी नाही म्हणाला. दमलो आहे , आराम करतो, खुप ऊन आहे असे म्हणाला,
 मग नंतर चार शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर तो तयार झाला, थोडाफार आराम करून आम्ही दुपारी १२ वाजता सणसणीत  उन्हात पदरगडावर जायला निघालो. अर्ध्या रस्त्या पर्यन्त भरपूर ऊन खाल्ले जसे जंगल लागले , तसे ऊन गायब झाले , ते जंगल इतके घनदाट होते की दुपारी १२-१ ची वेळही कळत नव्हती ,
 गडावर येताना रस्ता दाखवायला गावातले दोन पोरे सोबत होती एक होता "संजय हंडे "आणि दूसरा "मनोज दिवाळे " दोघांनीही  हातात मजबूत दोरखंड , आणि एक कोयता असा साहित्य घेतल होत. आता इथे जरा आम्हाला भारी वाटल की अरे वाह ! दोर वगैरे लावावा लागतो की काय ? त्याला जेव्हा विचारल तर तो "नाही लागणार "असे  म्हणाला. मग म्हणल चला ठीक आहे , अधे मधे राधा , साहिल विचारत होते त्याला दोर का आणलाय? .... दोर का आणलाय? तो आपल सांगायचा दोर लावून वर जायचय म्हणून आम्हाला वाटायच की मज्ज्या म्हणून सांगतोय !!! काही वेळाने आम्ही जंगल चढून वर आलो आणि वर पाहतो तर काय सरळ सरळ ७-८ फुट वर जायचय मोठमोठाले दगड त्यात हाताची ग्रीप घ्यायला जागा कमी आणि मागच्या बाजूला एकदम दरी.......

... हे सगळ पाहून इथे लोकांची पहिल्यांदा टरकली ( ताई लोकांची जरा जास्तच )!!! पहिल्यांदा गावातला संजय पुढे गेला . त्यानंतर अर्जुन ला पुढे घेतले मागे मी पुढे गेलो आणि मधे थांबलो बाकीच्या लोकांना पुढे जायला मदत करू लागलो तिथे वर जायला २ वाटा होत्या, एक निसरडया मातीची होती आणि दूसरी कातळवाट होती , थोड़े लोक पुढे गेले हळू हळू मागुन शचीने वर यायचा प्रयत्न केला पण तिला जमेनाच , थोड़ा कुठे पाय सरकला की तिची किंकाळी " आई ग !!!!!! आई !!आई !आई ! " दोन - तीन वेळा जमल नाहीं मग गेली पुनः खाली  "अरे मला जमत नाहीं आहे मी इथेच थांबते  खाली " आणि ती खालीच थांबली, मी , मिनल तिला वर बोलवत होतो पण ती कही येत नव्हती , मंदारपण शचीला वर बोलवत होता "ए अग काय लहान मूलांसारखे घाबरतेस ती लहान पोर पण घाबरली नाहीत तिही गेली आहेत पुढे आणि तू काय थांबली आहेस तिकडे  येतेस का आता लौकर "   मग वैतागुन ताई म्हणाली "मयूरेश मी इथेच थांबणार आहे तुला काही प्रोब्लेम आहे का? " मग ताई सोबत मीना आत्या ,श्रेया आणि सतिश थांबला त्यानंतर मिनल वर गेली त्यामागुन मधुकाका शूज काढून वर गेले ,आणखी १-२ पुढे गेले , मग मी शचि ला परत विचारल ताई येतेस का ? ये शूज काढून ? ताई ने पुनः मयूरेशला विचारले "मयूरेश येऊ का मी शूज काढून ?" मंदार म्हणाला "आता तू नको येउस तिथेच थांब सारख काय आहे हे..... ये ये जा जा " ताई म्हणाली "अरे येतेना आता शूज काढून जमेल मला " मंदार पुनः नाही म्हणाला ताई पुनः वैतागुन म्हणाली " मयूरेश मी वर येणार आहे तुला काही प्रोब्लेम आहे का? " आणि
शचिताई कातळावर चढताना :)
  घाबरत घाबरत 
इकडे पकड़ तिकडे पकड़ मधेच एक " आई ग !!!!!! आई !!आई !आई ! " असे करत करत मी जिथे थांबलो होतो तिथून पुढे गेली आणि तिथुन पुढे गावतल्या मनोजने शचि ला हात दिला आणि तात्काळ ताई वर गेली. हे सगळ चालु असताना , तिकडे जी दूसरी निसरडी वाट होती त्या वाटेने तो मनोज ताई ला हात द्यायला पुढे गेला होता. त्या वाटेने सुमित गेला. आणि तिथे जाऊन अडकला त्याला धड़ खालीही येता येईना आणि वर ही जाता जाइना , मग तो तिथेच ठाण मांडून बसला.  
शूज काढून बसलेला अडकलेला सुमित एका अवघड जागेवर  . 
मग तो त्या गाववाला मनोज ला दर पांच मिनिटांनी अरे मित्रा इकडे जरा दोर टाक ना मी येतो तिकडे मनोज इतर लोकांना आणि ताईला पुढे सोडत होता , तो म्हणाला आओ!!! दादा थांबा जरा तीकडेच,  येतुच मी सगळ्यासनी सोडून तुम्ही शूज काढ़ा बरं आलोच म्या !" शूज काढले, बराच वेळ वाट पाहून सुमित ने स्वतः डेअरिंग केलच  आणि तो आमच्या बाजूला आला ,
एक टप्पा संपला , तर दूसरा समोर उभा होता, दोन भलेमोठ्ठे कातळ आणि त्यांच्या मधून वर चढ़त जायचे, एकदम मला डिस्कव्हरी चैनल वरचा "Man Vs Wild" मधल्या बेअर ग्रील्स चे शब्द आठवले "यहापे आपको चिमनी तकनिक का प्रयोग करना पड़ेगा दोनों पत्थर काफी बड़े और ऊँचे है..  वगैरे वगैरे.......  "




चिमणी क्लाइंब मधे लावलेला दोर ( वरुन ) 
हृषिकेश चिमणी क्लाइंब मधे ( खालुन ) 


हृषिकेश चिमणी क्लाइंब मधे उतरताना 
साहिल उतरल्यानंतर 



ताई लोक चिमणी क्लाइंब मधे 
मंदारदादा दोर सांभाळून  


 आता इथे अशी गम्मत होती की दोर लावावा लागणार होता.  इथे जो टप्पा होता तो म्हणजे "चिमणी क्लाईंब" ( पाठ व पाय एकाचवेळी भिंतीवर  रोवून वर चढणे ) , इथे दोन्ही बाजूने मोठे कातळ होते आणि त्यांच्या मधून वर जायचे होते तिथे आतमधे फ़क्त एकवेळेस एक माणूस उभा राहु शकेल एवढीच जागा. मग मनोज आणि संजय दोघेही वर गेले आणि तिथे रोप बांधला आणि एकेकाला वरती यायला मदत करु लागले, आता इथे दोन लोकांची मज्ज्या येणार होती , एक म्हणजे शची ताई, दूसरा म्हणजे सुमित , आम्ही गमतीने म्हणालो सुम्या तू येऊ नकोस इकडे अडकलास तर खुप मोठी गड़बड़ होईल ! इकडे शची ताई निघाली "कुठे धरु इकडे ?? अरे जागाच नाही आहे इकडे , पाय कुठे ठेऊ ? कुठे दिसतच नाहीं आहे? आ !! ऊ !! अरे SSS !!!! "असे करत करत वर ताई जेव्हा अर्ध्या रस्त्यात गेली हातात दोर आणि ती जमीनी पासून ३-४ फुट वर गेली आणि मधेच परत एकदा किंकाळी ऐकायला मिळाली ," आई ग  !!!!!! आई !!आई !आई ! " ताईचा गुडघा आणि तो कातळ दोघांची जोरदार धड़क झाली तिला मुका मार लागला आणि पुनः मग हळु  हळु तशीच वर गेली, आता सुमित वर यायला निघाला . पहिली गोष्ट म्हणजे सुमित त्या जागे मधे मावला होता कुठेही न अडकता संपूर्ण हातातल बळ एकटाउन सुमित पण वर आला, कारण त्याच्या कड़े दूसरा मार्गच नव्हता परत जायच म्हणजे एकट्यालाच जावे लागणार होते आणि दूसरा म्हणजे तिथे थांबायला जागाच नव्हती.

पोहोचलो एकदाचे त्या टप्प्यावर....... 
  आता आम्ही अश्या ठिकाणी पोहोचलो होतो की दोन्ही बाजूला खोल दरी होती आणि वर किल्ल्यावर जायची वाट म्हणजे आणखी एक कातळटप्पा पार करावा लागणार होता मग तिकडे संजय आणि मनोज पुढे गेले आणि दोर लावले. वर गेल्यावर सुमित म्हणाला "का करतोय आपण हे ? काय गरज आहे ? इथे आलो भरपूर टरकली यापुढे तुम्ही जाऊन या !!.मग इथे बाकीचे लोक तसेच थांबले आणि मी आणि मधुकाका वर जायचे ठरवले मी थोड़ा वर गेलो आणि मंदारदादा विचारत होता येऊ का पण मग मी त्याला येऊ नको म्हणालो कारण थोड़ अवघडच प्रकरण होता ते आणि दादा आला असता तर एकेक सगळेच आले असते. एका बाजूने धरायला जागाही व्यवस्थित नव्हती , वर पोहोचलो निसरडी माती प्रकरण इकडेही होते पावले जरा जपुनच टाकावि लागत होती. थोडासा जरी पाय घसरला असता तर एकदम खालीच !!!
पुढचा कातळटप्पा - वर जातानाचा दोर 

गुहेत जायला निसरडा रस्ता 


एकदम वरच्या गुहेत 

गुहा
गुहेतुन दिसणारी तुरळक घरांची वस्ती - पदरवाड़ी 

मी , मधुकाका , संजय, मनोज 







   वर पोहोचलो समोरच गुहा दिसली अगदी प्रशस्त होती किमान ८-९ लोकतरी आरामत राहु शकतील तिकडे , पदरगडावरून पूर्वेला भिमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी पसरलेली दिसते. त्याच्या उत्तर टोकाला सिध्दगडाचा डोंगर दिसतो. गडाच्या उत्तरेला खाली तुरळक घरांची वस्ती दिसते, तीला "पदरगडवाडी" या नावाने ओळखतात.आम्ही जिथे राहिलो होतो ते घरही दिसत होते , पदरगडाच्या दक्षिणेला पेठचा किल्ला तर पश्चिमेला तुंगी किल्ल्याचे टोक दिसते. जरा वेळ मी , काका, संजय, मनोज तिथे बसलो आणि २-४ फोटो काढले आणि आम्ही निघालो तिथून आणखीही वरती जाता येत होता वर पाण्याच टाक आणि सुळका अश्या काही गोष्टी होत्या पण परत कातळटप्पा पार करावा लागणार होता आणि बऱ्यापैकी वेळ लागणार होता , तर तो प्लान आम्ही राहु दिला आणि पुनः त्या घळीत आलो , आणि परतीच्या प्रवासाला लागलो. जाताना मंदार ने शची ला दोरविना खाली उतरायला लावला , ताईची त्या वेळेला चांगलीच टरकली होती , किंकाळ्या मारत खाली उतरल्या नंतर ताई १० मिनिटे धुसफुसत श्वास घेत होती, सगळे खाली उतरलो अगदी आलो तसे , तीच मज्ज्या पुनः उतरताना आली सगळे आपले बुड टेकवत टेकवत खाली उतरले ,

आता आम्ही पदरवाडीत पोहोचलो आणि पहिल्यांदा सूप मग पोहे आणि रात्रि खिचड़ी करायची ठरल , आणि रात्रिच तिकडच्या मावशी कडून भाकरी आणि भाजी घ्यायच ठरल ,मग किती भाकरी लागणार मोजून फाइनल केला, आणि आत गेल्यावर त्यांना सांगितल पण मग कळल की त्यांच्या कड़े ते भाकरी बनवतच नाहीं ते फ़क्त भातच खातात, सूप तयार करायला घेतल , सूप एकदम कड़क झाल , ते प्यायलो आणि लगेचच पोहे बनवायला घेतले तोवर शची म्हणाली की मंदार खुप छान पोहे बनवतो , मग काय पुढचा चुलीमॅन मंदारदादा झाला , त्याने आणि शची ने बनवलेले पोहे इतके भारी झाले होते की वाह क्या बात !!!! पोहे खाऊन झाल्यावर थोड़ा वेळ आराम केला आणि खिचड़ी च्या तयारीला लागलो अंधार पडतच होता. सतीश दादा ने एकदम मस्त कांदा कापून दिला, आणखी शची ताई , मिनल ताई ने सगळे तांदूळ जमा केले धुतले बटाटा मसाल्याचे साहित्य आले , आणि आता हृषिकेश आणि मी खिचड़ी बनवायला घेतली चुलीमॅन ची धुरा पुनः माझ्याकडे आली काही वेळाने खिचड़ी झाली , त्यानंतर  मंदार आणि मी आणि अर्जुन ने पापड़ भाजले, छान जेवण झाल शचीने आणलेल्या लोणच्या मुळे आणखीच चव आली जेवायला.
जेवण झाले झोपायच्या सगळे तयारीला लागले. मी आणि मधुकाका बाहेर झोपणार असे ठरले होतेच त्यामधे हृषिकेश पण म्हणाला बाहेर झोपणार म्हणून, मी आणि हृषिकेश अजूबाजुला आणि काका थोडेसे मागे , आणि बाकी मंडळी आतमधे ,आम्ही जिथे झोपलो होतो तिथे आमच्या उजव्या हाताला बकऱ्या-बोकड-पिल्ले यांचा संसार मांडला होता. डाव्या बाजूला अजूबाजुलाच २-३ कुत्री आणि पिल्ले , मागच्या बाजूला शेणाने सारवलेले घर आणि आम्ही दरवाज्यासमोर झोपलो होतो , झोप लागायच्या आधी हृषिकेश म्हणाला " निखिल सावध झोप बरका !! मी एकदाका पालथा झोपलो की काहीही झाल तरी उठणार नाही , मला अजिबात जाग येत नाही , तेव्हा कुठलहि जनावर आले तर मला उठव !! "  मी ही म्हणालो "माझी पण झोप गाढ़ आहे अरे , घंटा नाद केलास तरीही मला जाग येणार नाहीं " सगळ्यांना शुभरात्रि करून आम्ही झोपलो आणि बरोब्बर २.३० ते ३.०० मधे आमच्या मागे जे कुत्रे झोपले होते ते बकरयांच्या गोठ्यापासून ते आमच्यामागुन जे जोरात भुंकत गेले आंम्ही दोघेपण सेम टाइम जे ताडकन उठलो , आणि दूरवर पाहु लागलो कुठे जनावर आलय का ते मग तेवढ्यात हृषिकेश म्हणाला "ते बघ कोणाचे तरी डोळे चमकत आहेत " याला कोणाचे डोळे दिसले कळाल नाही, आणि मला काही ते जनावरही दिसल नाही, आजूबाजुला जेवढी होती नव्हती तेवढी सगळी कुत्री दूरवर कुठेतरी भुंकत गेली , आणि पुढे सगळ्या झोपेच खोबर झाल , त्या सगळ्या बकरया - बोकड -आणि त्यांची पिल्ले या सर्वांची शि आणि शु करायची वेळ पहाटे ३-४ अशीच का असावी ? एकाच झाल की दूसरा मग तीसरा मग चौथा संपतच नव्हत त्यांच प्रकरण , त्यांच संपतय न संपतय झोप लागती आहे असे वाटत होते तोवर जोराचा सोसाट्याचा वारा सुटला अगदी थंड वारा उरली सुरली झोप पण उडाली.पुढचा १-२  ते वार तसच येत राहील.
        सकाळी ७-७,३० ला उठलो आणि तिथल्या मावशीकडेच चहा बनवायचे ठरले मीनल,शची यांनी मस्त फक्कड़ चहा बनवला , चहा चे दोन  राऊँड  झाले , पहिल्या चहा मधे जे कमी पड़ल होते ते पुढच्या चहा मधे अगदी बरोब्बर पडले ,
      आता आम्हाला घरी जायला दोन मार्ग होते एक म्हणजे सोपा गणेश घाटा मधून आणि दूसरा म्हणजे थोड़ा अवघड शिडी घाटा मधून आता आमच ठरले होते की आता एवढे adventure केले आहे आता अजुन कशाला करायचे कारण शिडी घाट मधून एक कातळटप्पा उतरावा लागणार होता परत २ शिड्या उतराव्या लागणार होत्या, आणि सोबत आता बॅग पण होत्या , नंतर ठरले की परत कुठे येणार आहोत ईकडे ,आलोय तर जाऊया जरा मज्ज्या करत.
पदरवाड़ी 
         सगळे एक पदरवाड़ी मधला शेवटचा फोटो काढून पोचलो जिथे तो शेवटचा कातळटप्पा होता ,



शचीताई आणि मदतीला गणपत हंडे 

खाली उतरतानाचा कातळटप्पा 

मिनलताई , हृषिकेश कातळटप्पा उतरताना  


























कातळटप्प्यावर हृषिकेश  
इथे पहिल्यांदा मधुकाका ,मंदार , गणपत हंडे हे पुढे गेले आणि आणि मधुकाका नि  हिरवा सिग्नल दिला , सगळे एकेक करून आले सर्वप्रथम शची आली इथे ताई जास्त घाबरली नाही कारण गेल्या २-३ काताळटप्याची तिला सवय झाली होती. पण तिचे पहिलेच वाक्य होते "कुठे पाय ठेऊ ? इकडे मग तिकडे "असे करत करत ताई एकदम छान पणे खाली उतरली, इथे मी पहिल्या टप्प्यावर थांबलो मग मधे गणपत हंडे आणि नंतर खाली मधुकाका, एकेक करून राधा अर्जुन पण पुढे गेले मग मीना आत्या आणि बाकी मंडळी इथे लोकांना उतरताना मज्जा आली मग पुढे दोन लोखंडी शिड्या (या शिड्या म्हणजे कुठेही बांधल्या नव्हत्या अधांतरी होत्या, आणि उतरताना हालायच्या.)
मधुकाका ,मंदारदादा आणि मंडळी पहिल्या शिडीवर पुढे पहिल्या दोन्ही अधांतरी शिड्या   


तिसरी आणि चौथी शिडी 
पायरीला  लवलेले कुलुप 


सतिशदादा शेवटच्या शिडीवर , 
त्या पुढे लोखंडी जीना त्यामधे पण एक मज्जा अशी की त्यातली एक पायरी तुटली होती. ती एका कुलुपाने बांधून ठेवली होती. त्यापुढे दूसरा की जो फ़क्त एक लोखंडी बार आणि दोन्ही एंडला बोल्टिंग केलेला असा होता,या शिड्या उतरल्या नंतर पुनः जंगल लागते आणि नंतर काठेवाडी नावाचे गाव लागते. मग तिथे पोहोचल्या नंतर हनुमान मंदिरामधे थांबलो , पाणी प्यायलो आणि एका सूमो गाड़ीवाल्याला गावातल्या लोकांशी बोलून बोलवला , अर्ध्या तासा मधे तो आला . त्याने आम्हाला कर्जत पर्यन्त सोडले , तिकडे गेल्यावर आम्हाला कळल की मेगाब्लॉक चालू आहे सगळ्या गाड्या उशिरा आहेत , तिथेच आम्ही वडापाव खाल्ला , आणि आम्हाला काहीवेळाने आम्हाला काकीनाडा नावाची एक्सप्रेस मिळाली , आणि आम्ही तिथून लोणावळ्यास उतरलो फ़क्त मीना आत्या पुढे सरळ पुणे स्टेशनला उतरण्या साठी पुढे गेल्या. तिथून आम्ही आकुर्डी साठी लोकल पकडली सुरुवातीला लोकल मधे काहीच गर्दी नव्हती , पण जसे जसे आकुर्डी जवळ आले तसे शेवटच्या २-३ स्टेशनला भरपूर गर्दी झाली सगळ्यांच्या बॅगा आणि साहिल ,राधा, अर्जुन, श्रेया या सर्वांना घेऊन उतरणे म्हणजे अगदीच अवघड झाले . जसे आकुर्डी स्टेशन येत होते तसे तसे शची ताईला टेंशन "आपल्याला उतरता येईल ना ? " मग मंदार म्हणाला "तू पुढे चिंचवड ला उतर ! तिथून ये मग निवांत " ताई परत टेंशन मधे , मग जेव्हा आकुर्डी आले जे सगळे तुटून पडले दरवाज्याच्या दिशेने , मंदार पहिला मग त्यामागे मी , राधा ,अर्जुन, श्रेया, मीनल असे सगळे आणि बाहेर येताना सगळ्या गोंगाटामधेहि ताईचा आवाज एक नंबर होता "अरे !! अरे !! सरका  !!! सरका !!! जाऊ दया मला !!!!  उतरायचय मला इथे !!! "  आम्ही बाहेर आलो होतो आणि फ़क्त ताई कड़े पाहत हसत उभे होतो. 

ट्रेक सदस्य :-

  1. मधुकर संत.
  2. मंदार संत. 
  3. शची संत. 
  4. राधा संत. 
  5. अर्जुन संत. 
  6. सुमीत संत. 
  7. सतीश अडरकट्टी.
  8. मिनल अडरकट्टी.
  9. साहिल अडरकट्टी.
  10. श्रेया अडरकट्टी.
  11. अनुराधा नारवेलकर.
  12. हृषिकेश चौधरी. 
  13. निखिल चौधरी.      

Monday 8 February 2016

KoraiGaD !

कोरीगड - कोराईगड
      चला !!!!  नवीन वर्षाची सुरुवात खुप छान झाली , एकंदरीत खूप जूना प्लान होता जायचा की माझ्या मैत्री ग्रुपला घेऊन एकदा ट्रेकला जायच पण जमतच नव्हता, शनिवार रविवार आणि कुठलाही सुट्टीचा दिवस तेव्हा फ़क्त क्रिकेट आणि क्रिकेट ( तस मला काही फार चांगल खेळता येत असही नाहीं पण मित्रांना खुप वेड क्रिकेट च . ) , तर ते आत्ता कुठे काही लोक स्वतःहुन तयार झाले आणि एकदा विचारले तर लगेच हो म्हणाले. ट्रेक साठी मित्रांनी ind vs aus च्या T -20 मॅच वर पाणी सोडले , काही लोक येतो म्हणून आले नाहीत ती गोष्ट वेगळी पण जे आले त्यांनी मज्ज्या केली. मग प्लान ठरला कोराईगडावर जायचा तसा छोटा आहे आणि जवळही आहे .
                       लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते.  मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. सकाळी सकाळी उठलो पण उठून काही फायदा झाला नाही. कारण लोकांनी यायला वेळ केला. साधारण १० वाजेपर्यंत सगळे आले निघालो १०.३० वाजता , देहुरोड -सोमाटणे फाटा - असे करत करत मधे रुपेश मिसळला थांबलो मिसळ खाल्ली ( आता इथे मिसळ ची चव ही बेचव झालेली आहे,पूर्वी सारखी सारखी राहिलेली नाहीं ) आणि मग निघालो.



               


                   लोणावळ्यात आम्ही १२ च्या दरम्यान पोहोचलो. लोणावळ्यांपासून साधारण गड २५ kms आहे ऊन भरपूर होत पण हवा थंड असल्या मुळे छान वाटत होत.बाइक वर जाताना मधे लायंस पॉइंट लागतो तिथे १० मिनट थांबलो आणि पुढे निघालो. अम्बी व्हॅली चा तो रस्ता खूपच सुन्दर आहे वळणावळणाचा घाटरस्ता, दोन्ही बाजूला खुप झाड़ी, रस्त्यावर छान सावली आणि दुपारच्या उन्हातही थंड वारा. आम्ही १२.३०-१२. ४५ ला पायथ्याला पोहोचलो . गाड़ी तिथेच लावली आणि चालायला सुरुवात केली. आता मात्र थंड वारा वगैरे प्रकरण नव्हत , कड़क ऊन लागत होत. थोडेच पुढे गेल्यावर रस्ता सोडून आम्ही झाड़ी झुडपात घुसलो मस्त सावली मधून चालू लागलो.

 वर पोहोचायच्या थोड़े आधी एक गणेश मंदिर लागते तिथेच एक गुहा आणि पाण्याचे टाके आहे , तीकडेच आम्ही ५-१० मिनीट थांबलो तर दुपारच्या उन्हात एक सापाच पिल्लू आम्हाला गणेश मंदिरावरच्या दगडांवर दिसल. साधारण २-३ फुट लांब होता.  बहुदा धामण असावा कारण रंग तपकिरी पिवळा आणि अंगावर बारीक़ नक्षी होती.थोडेच वर गेल्यावर उजव्या हाताला पिण्याच्या पाण्याचे टाके लागते , उन्हाने चालताना थोडा थकवा येतो पायऱ्याही तश्या भरपूर आहेत. आपले सगळे मित्र बऱ्याच दिवसातुन ( वर्षातुन म्हणाले तरी चालेल ) ट्रेक करत आहेत आशु,प्रतिक सोडला तर सगळे लोक बरेच दिवसातुन आले होते तरीही मंडळी कुठेही जास्त वेळ न थांबता आम्ही ४५-५० मिनिटांत आम्ही वर पोहोचलो गेल्यागेल्या समोरच दोन तळी दिसतात गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे.पाहिले आम्ही मग डाव्या बाजूच्या बुरुजा वर गेलो. वरुन अम्बी व्हॅली एकदम छान दिसत होती.
 जरा वेळ तिथे बसल्यावर थोड़े खाली त्याच बुरुजा वर सावलीत आम्ही जरा बसलो , मी मसाला भात बनवला होता आणि सुशांतने भाजी पोळी आणलेली होती,खाऊन झाल्यावर आम्ही दम शेरास खेळलो जामच मजा आली. टीम मी प्रणव आणि विनय वि. आशिष, प्रतिक, सुशांत. आणि आम्ही जिंकलो
     दुपारी आम्ही गडाच्या तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घातला. वरुन खालचा परिसर अप्रतिम दिसत होता. फिरून झाल्यावर लगेच आम्ही खाली उतरायला चालू केल.तासाभरात खाली उतरलो आणि लोणावळ्यात "गोल्डन वडापाव" इथे मस्त भजी आणि वडापाव हाणला. ( चांगला आहे इथे वडापाव खाऊ शकता :) ) आणि मग निघालो सगळे घरी.
       असा एक दिवसाचा छोटा ट्रेक छान आपण ठरवू शकता.
 ट्रेक सदस्य :
१. सुशांत साळवी.
२. आशिष दांदडे.
३. प्रतिक नहिरे .
४. प्रणव दीक्षित .
५. विनय कुलकर्णी.
६. निखिल चौधरी.