Wednesday 16 December 2015

PathFindeRs Very First TreK. HarishchandraGad

नमस्कार मित्रहो ,
     काही जुन्या आठवणींना उजाळा देऊया।
       साधारण ७ -८ वर्षांपूर्वी आमचा पाथफाइंडर्स चा पहिलाच आणि जिथे पाथफाइंडर्स हा ग्रुप तयार झाला तो ट्रेक होता "हरिशचंद्रगड़" आमचा पहिला वहिला ट्रेक आम्ही सहा लोक होतो। सगळे शाळेतले लोक,पहिल्यांदाच ठरल आणि मग एकदम  भरभक्कम तयारी झाली खच्चून सामान बॅग वैगरे भरून आम्ही सकाळी सकाळी निघालो सगळेच अगदी उत्साहात. आमचा प्लान ठरला होता तसे रस्ते पाहून ठेवले होते , पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणार्‍या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गाव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) नशिकफाटा ते खीरेश्वर प्रवास एकदम दणक्यात झाला, मग खीरेश्वर पासून चालायला सुरुवात केली पायवाट म्हणजे चांगली होती. आम्हाला ७ टेकड्या पार करायच्या आहेत एवढच माहिती होत.










आमच्या मधे एक जण तब्येतीने एकदम छान ( थोडक्यात जाड़ ) असा एक जण होता हर्षद त्याच नाव, निखिल आवारी नावाचा एक मित्र थोड्याश्या अवघड रस्त्याने वर गेला मगोमाग हा बंड्या !!.....तिथे तो अशक्य अश्या रीतीने गंडला त्याच्या पुढे निखिल बारीक़ असल्या मुळे पटकन चढ़ून गेला
, हा बंड्या एका अश्या जागेवर गेला की त्याला खालीही येता येईना आणि वरही जाता जाइना। ... बसला अडकून। .... मग जो भोंगा चालू झाला बापरे!!! ...


... माला हेलीकॉप्टर बोलवा !!! मी इथून हलणार नाही !!!!! माला हेलीकॉप्टर बोलवा!!!!!!,,,,,बराच वेळ त्याची समजूत काढण्यात गेला आणि आमच्यातला एक जण  त्याच्या इथे जाऊन त्याची बॅग घेऊन त्याला कसाबसा खाली आणला आणि बाजूच्या वाटेने त्याला घेऊन वर आलो मग बऱ्याच वेळाने आम्ही गडावर पोहोचलो .साधारण दुपाऱनंतर  ( नेमकी वेळ आठवत नाही ) गडावर पोचलो असावो . गेल्या वर निवांत आराम केला. समोर राहायला म्हणून एक गुहा शोधली आणि ती इतकी भारी होती की क्या बात !!! ...
१ बेडरूम हॉलची गुहा 
... तिला दोन रूम होत्या एक बेडरूम एक हॉल आणि एक व्हरांडा झोपायची आता सोय झाली होती कोण कुठे झोपेल हे ही ठरवून घेतला ...... हर्षद आणि निखिल आतमधे (बेडरूम ) मी नचिकेत मधल्या गुहेत ( हॉल मधे ) आणि सुबोध आणि  रोहित बाहेर (व्हरांडा) अशी आमची १ बेडरूम हॉल ची गुहा !!!!  ....... रात्रि डब्बे खालले आणि कदाचित  खिचड़ी केलि असावी रात्री मस्त हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे तिथे गेलो.
सुबोध, संत्या( गावतला मुलगा ) आणि रोहित 
 मोकळ्या आकाशात ग्रह तारे चांदण्या पाहण्याची मज्ज्या काही औरच !!!....मग रात्रि सगळे गुहेत परतलो आणि झोपलो रात्रि मधेच आतल्या गुहेत असलेल्या हर्षद मुजुमदार नावाच्या त्या ७०-८० किलोच्या देहाला बाहेर जायची हुक्की आली बैटरी वैगरे तत्सम गोष्टींना घ्यायचे कष्ट न घेता तो तसाच उठला आणि निघाला मधल्या गुहेत मी झोपत असल्या मुळे मला ओलांडून ज्याण्यापलीकडे त्याच्या कड़े दूसरा मार्ग नव्ह्ता मग काय जे व्हायला नको तेच झाले मी झोपेत असताना माझ्या नको त्या जागेवर पाय दिला " मेलो !!!!! मेलो !!!!"  छोटा निखिल मेला !!!!!!!! " मी खुप म्हणजे खूपच जोरात ओरडलो की सारी मंडळी पुढच्या २ मिनटात जागी झाली , मग त्याला ज्या शिव्या पडल्या की बस !!!
..........मग दुसऱ्या दिवशी काहीसा चहा नाश्ता करून परत हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात गेलो.
मग थोडेच पुढे एक केदारेश्वर  मंदिर ( छोटीशी गुहा ) गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरेभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे त्यामधे बर्फतुल्य पाणी .......आणि मधोमध एक शिवलिंग.....


                                 बापरे काय थंड पाणी होते तिकडे !!!! ..
.....सगळ्यांनी त्या बर्फा सारख्या थंड पाण्यात यथेच्छ अंघोळी आटोपल्या! ....... आमच्या आधीच्या प्लान नुसार आमच्या कड़े हा शेवटचा दिवस होता कारण तिसऱ्या दिवशी आम्हीं निघायच्या बेतात् होतो....पण आम्हाला तो गड , ती जागा खूपच आवडली. खूपच रहावेसे वाटत होते ......मग असा ठरल की आपला सामान पण बरेच शिल्लक आहे ( पहिलाच ट्रेक असल्या मुळे सगळ्यांकडे खुपच सामान होता जवळ जवळ सगळ्यानीच जास्तीचे सामान आणले होते कोणाला पावशेर कांदे सांगितले तर अर्धा किलो आणले होते,तसाच प्रकार बटाटे आणि पोहे वैगरे बाबतीत झाला होता मग आता सामान आहे ते घेऊन परत कसा जायच  ?? ( चला तसेही बरेच झाले आंम्हाला आपल  घरी सांगायला कारणही झाल. ) आम्ही असा ठरवला की आता आपला मुक्काम आपण दोन दिवस वाढवुया आणि हे घरी आत्ताच सांगायला पाहिजे मग आमच्या मधला सगळ्यात साधा सरळ आणि हुशार मुलगा सुबोध जोशी याच्या घरी पहिला फ़ोन करून सांगायचं ठरल आणि त्याच्या घऱचे बाकीच्यांच्या घरी सांगतील असे ठरले. आम्ही राहात होतो तिकडे रेंजचा प्रॉब्लम असल्या मुळे तिथे जवळच तारामती नावाच एक पठार होते तिकडे रेंज येते ऎसे कळले तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो मग आम्ही ४ जण निघालो तारामती वर.
लावला फ़ोन ,,,,ट्रिंग ट्रिंग
सुबोध : हेलो दादा मी मनु बोलतोय।
सुबोधचे बाबा :   बोल रे ! केव्हा पोचलात गडावर !!
सुबोध : काल दुपारी पोचलो ......वगैरे ..वगैरे . ......
सुबोधचे बाबा : काय  जेवलात ....वगैरे .वगैरे .. ......
(असा काही वेळ संवाद झाल्यानंतर )
सुबोध : दादा , आम्ही आणखी दोन दिवस गडावर राहु का ?
सुबोधचे बाबा : ( काही सेकंद पॉज़ )....... नको। 
सुबोध : दादा आम्ही गडावर आणखी दोन दिवस राहतोय !!! खायच खूपच सामान राहिलय आहो !!!
सुबोधचे बाबा : ( परत एक मोठा पॉज़ ) आणि काहीतरी म्हणाले.
सुबोधचे बाबा काय म्हणाले ते आता आठवत नाही पण सुबोध ने बराच वेळ पटवल्या नंतर शेवटी आम्हाला परवानगी मिळाली आणखी कोणीतरी फोन लाउन घेतला आणि बाकीच्यांच्या घरी कळवा असे सांगून आम्ही निघालो..........निघेपर्यंत आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाला  आणि कोणाच्या बैटरी आणायच्या पण लक्षात नाहीं राहिल जवळ जवळ अंधार पडलाच होता आणि त्यात रस्ता सापडेना........मग सगळ्यात पुढे नचिकेत एक सूरा घेऊन दिसतील तेवढी झाड़े उडवत वाट बनवत चालला होता त्यामागुन आम्ही सगळे , चंद्र होता त्यामुळे बऱ्यापैकी चांदण होते आणि तेवढ्यात सुबोधचा एक पाय दोन दगडांच्या मधे जवळ जवळ ३-४ फूटाच्या एका फटित गेला आणि तो पडला.... .... ... खूपच जोरात तो कळवळला तिथे त्याचा तळपाय पूर्ण पणे मुडपला होता हलकेच पाय बाहेर काढला आणि जरा वेळ तिथेच बसलो मग थोड्या वेळाने तश्याच अंधारात एक हाथ माझ्या खांद्यावर दूसरा दुसऱ्याच्या खांद्यावर असे जरा मंदिरा जवळ पोचलो तेव्हा पोराना आवाज दिला , लगेच त्यांनी पण आवाज़ ऐकला मग आम्ही कसेबसे पोचलो एकदाचे मंदिरा जवळ आणि लोकाना खुशखबर पण दिली , आम्ही तिघे कसेबसे गुहेत पोचलो तेव्हा त्याच्या पाय खूपच सुज़ला होता मग त्याला टाइगर नावाचा बाम लावला आणि क्रीप बैंडेज बांधले त्याला खूपच वेदना होत असाव्यात कारण तो सुझलेला पाय पाहूनच आम्हाला कळल होत की पायाला खुप जोराचा झटका बसला आहे. सगळे काही वेळाने झोपले मधे रात्रि एकदा सुबोध उठला बैंडेज काढला आणि तो टाइगर बाम पाण्याने धुतला कारण तो बाम इतका डेंजर होता की लावल्या नतर काही वेळाने त्याच्या पायाला इतके झणझण होत होते की शेवटी त्याने बाम धुतला आणि पुन्हा झोपला.
     तिसऱ्या दिवशी सकाळी पायाची सूज थोड़िशी कमी झाली होती पण तो चलायच्या अवस्थे मधे नव्हता मग हर्षद त्याच्या सोबत गुहेत थांबला आणि आम्ही कोंकणकड्यावर जायचा बेत केला चाहा नाश्ता झाल्यावर आम्ही कोकणकड्यावर गेलो अप्रतिम दॄश्य  !!!!!!!
 
 

 
अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट . संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे खोल दरी आणि सूर्यास्त वाहह मस्तच होता तो कोकणकड़ा।
निखिल ( २ ) , नचिकेत 
        दिवसभर भटकलो आणि मग संध्याकाळी परत गुहेत आलो सुबोधच्या पायाला थोड़ा आराम मिळाला होता पण त्याचे दुखणे काही थांबत नव्हते परत एकदा बाम लावला आणि धुतला ........ त्या दिवशी त्याला आराम मिळाला हे बरेच झाले कारण पाचव्या दिवशी आम्ही निघणार होतो....... बऱ्यापैकी सामान पण संपले होते.
         मग पुढच्या दिवशी आम्ही सगळे आवरले आणि निघालो सुबोधचा पाय दुखतच होता पण  दुखणे थोड़े कमी झाले होते आणि हळु हळु थांबत थांबत निघालो सगळ्यात पुढे मी आणि रोहित आम्ही आपले नेहमीच्या स्पीड ने निघालो पुढे मागे सुबोधचा पाय दुखावल्याने तो हळु चालत होता , नचिकेत आणि निखिल सुबोधसोबत असल्याने तेही हळू आणि हर्षद आपल्याला यांच्या सोबत संथ गतीने जायला मिळेल आता कोणी आपल्याला पळवणार नाही या आनंदात निवांत चालत होता , मग थोड़े पुढे गेल्यावर आम्ही म्हणजे मी आणि रोहित ( बालेकिल्याच्या वाटेने ) चुकीच्या रस्त्याने गेलो आणि एक जागा अशी आली की आणखी थोड़े पुढे गेलो असतो तर डायरेक्ट दरित!!!! मग मागे वळून पाहिले साधे कुठले कुत्रे पण दिसत नव्हते। मग आम्हाला कळल की आपण खूपच वाईट चुकलोय आणि वाट पहात बसलो बाकीच्यांचि पण अर्धा तास झाला तरी कोणी आले नाही आम्हाला वाटले की सगळे एकत्र चुकले पण चुकलो फ़क्त आम्हीच होतो बाकीचे कुठल्याश्या दुसऱ्या वाटेने गेले होते मग आम्ही मागे गेलो पण कोणीच दिसेना खुप आवाज दिले लोकाना पण काहीच पत्ता नाही सगळ एकदम  सामसुम  मग मात्र थोडिफार टरकली , आम्ही कोणी गावातले लोक दिसतात का ते पाहू लागलो पण कोणीच दिसेना शेवटी रोहित म्हणाला आपण असेच इथून खाली उतरुया जिथे पोचेल तिथे पोचू खाली गेल्यावर पाहु काय ते  ! पण तसे जाणे खुप रिस्की होते म्हणून मग ते  रद्द केले , तसेच आम्ही आलो त्या वाटेने माघारी निघालो येता येता दुरवर २ गावातले लोक दिसले आणि मग त्यांना हातवारे करुन रस्ता विचारला आणि त्या वाटेने  निघालो थोड़ेच खाली आल्यानंतर आमची बाकीची गॅंग वरुन आम्हाला दिसली नशिबाने ते हळूहळू चालत असल्यामुळे त्यांच्या पासून आम्ही तासा दीड तासांच्या अंतरावर होतो. मग वरुन  आवाज दिला आणि मग ते थांबले आम्ही गेलो भेटलो आम्ही खुश तेहि खुश !!! आणि इकडे यांना भलतच टेन्शन कुठे गेले हे दोघे ? कुठे पडले की काय ?? काय झाल ? वगैरे  वगैरे.....
          पण मग त्यानंतर सर्व जण एकत्रच चालू लागलो मग आपल्या या ग्रुप चे नाव काय ठेवूया यावर खुप नावे सुचवली गेली मग असाच सगळ्यांचा विचार लक्षात घेता शेवटी एक नाव सगळ्यांना आवडले आणि ते "पाथफाइंडर्स" असे  ठरविण्यात अाले।    
हर्षद , रोहित ( दिसत नाहीये :P ),निखिल (१),निखिल (२), सुबोध 
          जवळ जवळ ५-६ तासाने खाली पोचलो रात्रि मिळेल त्या  गाडीने पुणे गाठले मग दुसऱ्याच दिवशी सुबोध डॉक्टर कड़े गेला आणि तेव्हा कळले पायाच्या लिगामेंट्स ब्रेक झाल्या आहेत!!!! मग काय आल्यावर थोड्या फार शिव्या आणि गडावर केलेली खुप मज्ज्या २-३ दिवसांचा ठरलेला ट्रेक ४-५ दिवसांवर गेला असा आमचा पहिला ट्रेक संस्मरणीय ठरला !!!
ट्रेक सदस्य।
१) सुबोध जोशी
२) नचिकेत आराध्ये
३) निखिल आवारी
४) रोहित गडेकर
५) हर्षद मुजुमदार
६) निखिल चौधरी

  

2 comments:

  1. Awesome .....bakicha kissa nahi lihila ,Kutryachya Shu cha

    ReplyDelete