Tuesday 15 December 2015

SudhaGad !



सुधागड !


            हा एक खुप छान असा महाराजांच्या नजरेतला आणि रायगड या गड़ाशी मिळता जुळता असलेला , यावरील टकमक टोक , बुरुज थोड़े फार रायगडा सारखे आहेत ..पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २-३ तासात आपण पोचतो. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये दोन लोखंडी शिडया लागतात .
         आम्ही चार जण होतो. दुपारी २-३ च्या सुमारास निघालो निगडी भक्ति-शक्ति येथून खोपोली ST पकडली. साधारण ४-३० ला आम्ही खोपोलित पोचलो. तिकडून पाली ची ST पकडली.पाली मधे आम्ही ६.३० ला पोचलो. ७. १५ ला पुढची पाच्छापूर ची ST आहे कळले मग नाश्ता केला आणि ST ची वाट पाहत बसलो.
मग तिथेच इंटरनेट वर गडाची माहिती वाचत असताना एक ब्लॉग दिसला "हॉन्टेड सुधागड " ती लिंक अशी :-
http://indianhorrortales.blogspot.in/2013/04/the-haunted-encounter-on-sudhagad-fort.html
आम्ही ती ओपन केली सगळे जमा होऊन बसलो स्टॅंड वर आणि चालू केला वाचायला, तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडला होता, ती ७ मुलांच्या ट्रेक ची एक कथा होती वाचत वाचत मधे असे आले,
"It was an Amavasya (New Moon) night and our path was quite eerie"
         इथे आमची थोड़ी टरकली कारण त्या दिवशी पण अमावस्याच होती. मग वाचत वाचत त्या भूतांच्या वातावरणात गेलो आणि बऱ्यापैकी फाटली, तुम्ही पण वाचा हा ब्लॉग मज्ज्या येईल. त्यामधे बॉब्या (दिनेश) हा आमच्या पासून थोड़ा दूर बसला होता आणि आम्ही काय वाचतोय ते मुद्दामून ऐकत नव्हता ,( कदाचित जास्तच टरकला असावा ) . मग सगळा ब्लॉग वाचुन झाल्यावर आमच्या एकमेकांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. मग नंतर त्या ब्लॉग च्या कमेंट्स वाचायला चालू केला आणि जेवढी भीती वाटली होती ती सगळी पळुन गेली.मग जाम हसलो ज्याने हां ब्लॉग लिहिला होता त्यावर. मग थोड्या वेळाने ST आली आणि आम्ही निघालो पाच्छापूरला. साधारण ८.३० -९.३० च्या दरम्यान आम्ही पोचलो आणि आम्ही जे रात्रि गड चढणार होतो ते रद्द केल आणि तिथेच मुक्काम करायचा ठरवल मग रहायची सोय पण लगेच करुन टाकली, ज्या ST मधून आम्ही आलो होतो ती तीकडेच राहणार होती. मग जरा गप्पा मारल्या ड्राइवर सोबत जमवली गट्टी आणि त्याला म्हणालो की दूसरी कड़े कुठे जागा नाही मिळाली तर ST मधे राहु तेहि म्हणाले "रहा ! रहा !! एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाची मदत नाहीं करणार तर कोण करणार!!!!" मस्त होते ते पेण बस स्टैंड चे बहुचर्चित ड्राइवर "वसु पाटिल". त्यानेच आमची पाण्याची आणि चहा,सूप करायला जळन याची एका गावातल्या माणसा कडून सोय केली.
.

मग चहा बिस्किट आणि काही वेळाने सूप झाले आणि नंतर शेवटी आम्ही वरुण ने आणलेल्या कचोरया हाणल्या, केवढ्या होत्या त्या वाहह!!!!! :d ( झाल काय वरुण ने आम्हाला सांगितला होता की माझ्या कड़े खुप कचोरया आहेत अापले पोट भरेल आणि जेव्हा त्या बाहेर आल्या. हा! हा!! हा!!! . कचोरया कम पाणीपुरीच्या पूरया होत्या आणि मग आम्ही सूप पिल्याने बऱ्यापैकी पोट भरले होते पण आण्ण्य़ाला (अभिराज ) भूक लागलीच होती मग त्याला तसाच कचोरया खायला घालून थोडेफर सटर फटर खाऊन बसवला ) .अमावस्या असल्याने आकाश अगदी झकास दिसत होता मग उल्का पहात गप्पा मारत रात्रि ११. ३० - १२ वाजता झोपायला ST गाठली. ड्राइवर ने आमच्यासाठी गाड़ी लॉक केलि नव्हती मग गेलो सगळ्यानी जागा पकडली आणि झोपलो.
          पहाटे ५. १५ लाच ड्राइवर आणि कंडक्टर आले पटापट उठलो आणि आवरुन आभार मानून खाली उतरलो मग मस्त फक्कड़ चहा केला आणि ७. ३८ ला आम्ही गडावर जायला निघालो. छान होता वातावरण जास्त थंडीपण नव्हती आणि गार वारा सुटला होता .
तसा पाहिला तर गड खुप मोठा आहे. वर खुप मोठे पठार आहे. जाताना दोन लोखंडी शिड्या लागतात.

थोडेच पुढे एक बुरुज लागतो तिथे जायला एक छोटासा अंधारा जीना आहे. त्या जिन्यामधे भल्या मोठ्या पाली आहेत , झाल काय आम्ही आपले जात असताना एक भयंकर दिसणारी, माझ्या हाताच्या पंज्या पेक्षाही मोठी असणारी एक पाल वाटेत शांत पणे बसली होती, तिची नखे एकदम अणुकुचिदार होती. आम्ही आपले २-३ फोटो काढले आणि बुरुजा वर जायला निघालो तिकडे जायला ती एकच वाट होती, मग आम्ही...... का........... कु..........करत करत आणखी पुढे निघालो सगळ्यात पुढे मीच होतो अंधार होता आणि थोड़े पुढे जाताच बॉबी (दिनेश) ला बैटरी लावायला सांगितली आणि त्यानी बैटरी लावताच जी पोरे ओरडली सगळी सुसाट परत एकदम वरर !!! मी २ मिनट तसाच स्तब्ध !!!!!! माझे दोन्ही हाथ दोन्ही भिंती फ़क्त पासून ३० -३५ सेंटीमीटर वर असतील. मी माझे हाथ दोन्ही भिंतीवर ठेवणार इतक्यात बैटरी लावली जर ठेवले असते तर दोन्ही हातात दोन त्या तिथे बसलेल्या  भल्यामोठ्या पाली आल्या असत्या !!!!!
तसाच आलो आम्ही माघारी बुरुज पहायची कोणाची इच्छा राहिली नाही त्या पाली पाहुनच पोट भरले ........ तिकडे आम्हाला तरी ४-५ पाली दिसल्या आणखी किती होत्या कोणास ठाऊक !!!! तिथून जसे वर आलो तीकडे थोड़ेच पुढे एक पिण्याच्या पाण्याच टाक होता वर थोड़े पुढे गेल्यावर एक कोरडा ओढ़ा लागला एव्हाना उन बरेच वाढले होते मग थोड्या वेळाने पायऱ्या चालू झाल्या काही पायऱ्या चढल्यावर बराच वेळ चालल्या नंतर एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो ११.०० वाजले होते.वरती खुप मोठे पठार आहे . सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर इकडे एक विशाल बुरुज आहे .वाड्याच्या मागील बाजूस एक शिवमंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात. तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे.
 
हे  सर्व पाहून झाल्यावर आम्ही तिकडच्या वाड्यामधे बस्तान टाकल. तिकडे भरपूर माकडे आहेत जास्त त्रास नाही दिला त्यांनी आंम्हाला पण त्यांना हुस्काउन लावण्यात थोड़ा फार वेळ गेला. मग आम्ही खायच्या तयारीला लागलो. पोहे खायची लोकांना इच्छा झाली , मग पोहे केले 
   
आणि खाऊन झाल्यावर एक झोप काढली. झोप काढत असताना अर्धे लक्ष माकडांकडे, दुपारी ४ वाजता सगळे उठले आणि मग चहा केला. पाणी सगळे संपले होते, पाणी भरायला जवळच थोडेसे उतरल्यावर दोन टांके होते , आम्ही गेलो खाली भांडी घासली ,पाणी भरले पाणी भरायच्या इथे डाव्या बाजूला मोठे बुरुज तिकडेच घळीत प्रतिध्वनी येत होता शिट्टी वाजवली पुनः अगदी छान ऐकू येत होती.  
 
मग मी बासरी सोबत घेतलीच होती बसलो थोडीफार वाजवली आणि निघालो. परत वाड्यावर आल्यावर एक नविन ग्रुप दिसला त्यांचा इरादा आमची चूल घ्यायचा होता आंम्ही लगेच खिचड़ी करायला घेतली आणि आमची आमची चूल ताब्यात घेतली :) अर्थात दिली असती त्याना पण उगाच मग नंतर उशीर झाला असता आम्हाला मग आमच उरकल खिचड़ी झाली , वरुण ने मस्त पापड़ भाजले ,काही वेळातच आम्ही खायला बसलो आणि यावेळेला खिचड़ी भलतीच तिखट झाली आण्ण्य़ाने (अभिराज) आणलेला मसाला एकदम तिखट होता तरीही मी दोन चमचेच टाकला त्याने आणखी अर्धा चमचा नंतर वाढवलाच ती झाली तिखट !!! आणि अंदाज पण चुकला, खिचड़ी थोड़ी जास्तच झाली चांगलीच मज्ज्या झाली आमची. जेवणे झाली आता बाहेर पठारावर जायचा बेत केला. मक्याचे कणिस आणले होते ते बॉबी(दिनेश) आणि वऋण ने भाजले त्याला लिम्बु मिठ वगैरे लावले आणि ते घेऊन आम्ही रात्रीच्या अमावस्येच्या अंधारात पठारावर गेलो.तिकडे पहुडलो खुप साऱ्या उल्का पहिल्या , बहुतेक रोज रात्रि उल्का पडत असाव्यात शहरात आजूबाजुला उजेड असल्यामुळे त्या दिसत नसाव्यात. त्या दिवशी पण आम्ही रात्रि १२ वाजता परत वाड्यावर गेलो गप्पा मारत कधी झोप लागली कळल पण नाही. झोपताना ठरवल की सकाळी ६.३० ला निघायच आणि ९.३० ची ST पकडायची.
           तिसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोबाइल चा गजर वाजू लागला आणि जाग आली सगळ्या बैग्स भरल्या आणि ७. ३० ला निघालो जाताना आलो त्या वाटेने निघालो सोबत गडावरच एक कुत्रहि सोबत निघाल. ते कुत्र सोबत निघाल खर पण ते आम्हाला वाट दाखवत नव्हत उगाच आमच्या सोबत आमच्या मधे मधे करत होता कदाचित त्याला भूक लागली असावी पण आमच्या कड़े द्यायला काहीच शिल्लक नव्हत. संत्री होती पण ते त्याला तोंडाही लावत नव्हत मग कसबस ते शिडी पर्यन्त आले आणि शिडी उतरायलाच तयार नाहीं किती त्याला यु यु केल तरी तिथेच !!!! मग आम्ही निघालो त्याला सोडून. आम्ही बरोबर ९. ०० वाजता खाली पोहोचलो आणि १०-१५ मिनिटातच ST आली आम्ही पालीला आलो तिकडे बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले आणि स्टॅंड वर मस्त चहा आणि वडापाव खाऊन निघालो. पुण्याची गाड़ी खुप वेळाने होती मग आम्ही पुन्हा खोपोलीला जायचा ठरवल आणि खोपोलीला पोहोचलो , तिथून पुण्याची गाडी मिळायला बराच वेळ लागला शेवटी मग उभे राहून जाऊया ऎसे ठरवले आणि निघालो गम्मत अशी की पहिल्याच स्टॉपला मला बसायला जागा मिळाली बाकीच्याना पण लगेचच जागा मिळाली. आम्ही दुपारी ३ वाजता पुण्याला पोहोचलो.
       असा आमच्या ट्रेकिंग च्या यादि मधे आणखी एक छान ट्रेक जमा झाला.
 आलेले सदस्य :
१) दिनेश आडकर
२) अभिराज कचरे
३) वरूण आघारकर
४) निखिल चौधरी  


    The PathFindeRs    



5 comments: